
स्थैर्य, मुंबई, दि. 23 : जेष्ठ रंगकर्मी सुहास विरकर यांचे आज पहाटे आकस्मिक निधन झाले. 30-35 वर्ष रेल्वेची सेवा, नाट्यदर्पण, नाट्यसम्पदा, आविष्कार, मुंबई मराठी साहित्य संघ अशा अनेक स्वंस्थाच्या वाटचालित त्यांची साथ होती, अनेक एकांकिका नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली. अनेक पुरष्कार त्यांना मिळाले.
रंगभूमी हीच कर्मभूमी मानणाऱ्या या ज्येष्ठ आणि हरहुन्नरी कलावंताला सर्व रंगकर्मींच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
अल्पशा आजाराने वयाच्या 68 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्याचे पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, बहीण, भावंडे आहेत.