
स्थैर्य, फलटण, दि. ०९ जानेवारी : फलटण शहरातील उमाजी नाईक चौक येथील राजे गटाचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत कार्यकर्ते शाहुजी (नाना) मदने यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
राजे गटाचे एक ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. उमाजी नाईक चौक परिसरातील सामाजिक आणि राजकीय कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे.
त्यांच्या अकस्मित निधनामुळे उमाजी नाईक चौक परिसर आणि राजे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
