साळुंखे – पाटील बारामतीला गोविंद बागेत; विविध चर्चांना उधाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 14 ऑगस्ट 2023 | फलटण | फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील हे माजी केंद्रीय कृषिमंत्री व राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या भेटीला गोविंद बाग, बारामती येथे गेल्याने विविध चर्चांना उधाण आलेले आहे.

राज्यामध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर खासदार शरद पवार हे पहिल्यांदाच बारामती येथे आलेले आहेत. बारामतीमध्ये आल्यानंतर खासदार शरद पवार यांनी आपला नियमित दिनक्रम असतो त्याप्रमाणे राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आजचा दिवस राखीव ठेवण्यात आलेला आहे. यामध्येच फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील यांनी खासदार शरद पवार यांची बारामती गोविंद बाग येथे जाऊन भेट घेतल्याने फलटण तालुक्यामध्ये विविध चर्चांना उधाण आलेले आहे. यावेळी युवा नेते जितेंद्र साळुंखे – पाटील व सुरवडीच्या सरपंच सौ. शरयू साळुंखे – पाटील यांची उपस्थिती होती.

काही महिन्यांपूर्वी राज्यामध्ये जी उलथापालथ झाली; त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर गेले आहेत. त्यामुळे फलटण तालुक्यामध्ये खासदार शरद पवार हे आता हळूहळू लक्ष घालायला लागली असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.


Back to top button
Don`t copy text!