दैनिक स्थैर्य । दि. ०२ जानेवारी २०२३ । फलटण । भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा हे दि. ०५ जानेवारी व दि. ०६ जानेवारी रोजी फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये फलटण शहरासह तालुक्यात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. भारतीय जनता पार्टीच्या मिशन २०२४ ची सुरवात नुकतीच करण्यात आलेली होती. हि मोहीम आता फलटणमध्ये सुद्धा आली आहे. यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांच्याकडे फलटणची जबाबदारी दिली असल्याचे कळत आहे.
2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज आहे.त्यासाठीचं त्यांनी नव्या मिशनची घोषणा केली आहे. ‘मिशन 144’ ची घोषणा त्यांनी केली आहे. या ‘मिशन 144’ ची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्र्राच्या चंद्रपुरातून करणार आहेत. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असणाऱ्या फलटणमध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा हे फलटणमध्ये दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आखला आहे.
भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा हे दि. ०५ जानेवारी रोजी सोलापूर येथून सायंकाळी ६ वाजता कोळकी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहावर येणार आहेत. त्यानंतर ते कोळकी येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट देणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता राष्ट्रीय पदक विजेती कु. देविका घोरपडे हिचा ब्राम्हण गल्ली येथील निवासस्थानी यथोचित सत्कार करणार आहेत. सायंकाळी ७.२० वाजता विचार परिवार समन्वय कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहेत. सायंकाळी ७.४५ मिनिटांनी मारवाड पेठ येथील श्री कृष्ण मंदिरामध्ये उपस्थित राहून दर्शन घेणार आहेत. त्यानंतर रात्री ०८.२० मिनिटांनी कोळकी येथे लोकसभा कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सोयीनुसार हॉटेल जॅक्सन इन येथे मुक्कासाठी जाणार आहेत.
भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा हे दि. ०६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता निंभोरे येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेची पाहणी करणार आहेत. सकाळी ०९.१५ मिनिटांनी मलठण येथील श्री सद्गुरू हरिबुवा महाराज मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेणार आहेत. सकाळी १०.३० वाजता फलटण येथील प्रशासकीय कार्यालयांना भेट देणार आहेत व सातारा जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांची आढावा घेणार आहेत. यांनतर सकाळी ११.४५ मिनिटांनी रिंगरोड येथील जनऔषधी केंद्राला भेट देणार आहेत. दुपारी १२.३० मिनिटांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभर्त्यांशी महाराजा मंगल कार्यालय येथे संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी ०१.३० मिनिटांनी महाराजा मंगल कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ०२.१५ मिनिटांनी मंगळवार पेठ येथे सचिन अहिवळे यांच्या निवासस्थानी सामाजिक दुर्बल घटकातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सदिच्छा भेट देणार आहेत. दुपारी ३ वाजता फरांदवाडी येथे जल जीवन मिशनचे भूमिपूजन करण्यात येणार आहे व त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. व येथून पुणेकडे मार्गस्थ होणार आहेत.