गोखळी येथील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र भागवत यांचे अपघाती निधन; परिसरात शोककळा

गोखळी-माळेगाव रस्त्यावर अपघात; दांडगा जनसंपर्क असलेले व्यक्तिमत्त्व हरपले


स्थैर्य, गोखळी, दि. ३० ऑगस्ट : गोखळी, ता. फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र भागवत यांचे आज एका भीषण अपघातात निधन झाले. गोखळी येथून बारामती तालुक्यातील माळेगाव येथे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने गोखळी गावासह फलटण तालुक्याच्या संपूर्ण पूर्व भागावर शोककळा पसरली आहे.

श्री. राजेंद्र भागवत हे पत्रकारितेतील एक परिचित नाव होते. त्यांचा गोखळी आणि परिसरातील गावांमध्ये दांडगा जनसंपर्क होता. मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांना आपलेसे वाटत. विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या निधनाने पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

त्यांच्या पश्चात मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या गावी गोखळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने तालुक्याच्या पूर्व भागातील एक अभ्यासू आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!