
स्थैर्य, फलटण, दि. १८ ऑगस्ट : फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ बाबुराव बोंद्रे यांचे वडील, बाबुराव शंकरराव बोंद्रे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी आकस्मित निधन झाले. ते वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथील रहिवासी होते.
त्यांच्या पार्थिवावर आज, सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वाठार निंबाळकर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने बोंद्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

