
स्थैर्य, नवी दिल्ली, दि. १०: ज्येष्ठ पत्रकार व माध्यम तज्ज्ञ राजा माने हे महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव-वसंतदादा’ या विषयावर उद्या १० एप्रिल २०२१ रोजी व्याख्यानमालेचे २३ वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’सुरु आहे. या व्याख्यानमालेत १० एप्रिल रोजी राजा माने हे दुपारी ४.०० वाजता विचार मांडणार आहेत.
राजा माने यांच्याविषयी…
राजा माने सध्या ‘खमक्या इंडिया’ या न्यूज वेबसाईट, न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेलचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. दैनिक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक म्हणून त्यांनी कार्य पाहिले आहे. दैनिक लोकमतच्या कोल्हापूर आणि कोकण विभागाचे संपादक म्हणून आणि अहमदनगर आवृत्ती प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. दैनिक एकमत आणि दैनिक सुराज्यचे संपादक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. दैनिक पुढारी आणि दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी कार्य पाहिले आहे. श्री. माने, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे (महाराष्ट्र) संस्थापक अध्यक्ष आहेत .
‘महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा’ हा चरित्रग्रंथ त्यांनी लिहिला आहे. ‘अग्निपंख’ हा दैनिक एकमत मधील निवडक अग्रेलेखांचा संग्रह प्रसिध्द आहे. ‘लेक माझी लाडकी’, ‘गुरुजन’, ‘उगवतीचे रंग’,‘चारुकीर्तीवाणी’ ही त्यांची पुस्तकेही प्रसिध्द आहेत.
श्री. माने यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे, यात महाराष्ट्र शासनाचा विकास वार्ता पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अग्रलेखनासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचा कै. काकासाहेब खाडिलकर पुरस्कार, कै.बाबा.दळवी शोधपत्रकारिता पुरस्कार आदींचा समावेश आहे.
समाज माध्यमांद्वारे उद्या व्याख्यानाचे प्रसारण
शुक्रवार, 10 एप्रिल 2021 रोजी दुपारी 4 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युट्यूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.