
स्थैर्य, सातारा, दि. 19 डिसेंबर : सातारा येथे होणार्या नियोजित 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या निमित्ताने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. घालमोड्या दादांचे संमेलन व आमची भूमिका या विषयावर जेष्ठ पत्रकार व विचारवंत निरंजन टकले (नाशिक) यांचे व्याख्यान मंगळवार दि. 23 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सातारा येथे होणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र व शिव, फुले, शाहू,आंबेडकरी संघटनांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी चौदाव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर आहेत, अशी माहीती प्रसिद्धी पत्रकाद्वारे विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्या वतीने देण्यात आली आहे.

