स्थैर्य, मुंबई दि.७: बॉलिवूडमधील जुने आणि जाणते दिग्दर्शक जॉनी बक्षी यांचे मुंबईत निधन झाले. जॉनी यांचे मित्र अमित खन्ना यांनी या बातमीला दुजोरा दिला.
श्वास घ्यायला त्रास होत असल्याने बक्षी यांना तातडीने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची कोविड चाचणी देखील करण्यात आली. मात्र, या चाचणीचा अहवाल समोर येण्यापूर्वी त्यांचं निधन झालं होतं. आपल्या कारकीर्दीत त्यांनी मंजिले और भी है, विश्वासघात, रावण, मेरा दोस्त मेरा दुष्मन, भैरवी आणि कजरारे या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. याशिवाय, राजेश खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला ‘खुदाई’ या सिनेमाचं दिग्दर्शन देखील केलं होतं. 1994 साली आलेल्या हार जीत आणि 2000 साली आलेल्या ‘पापा कहते है’ या सिनेमात भूमिका देखील केल्या होत्या.