फलटण आगारातील ज्येष्ठ वाहक श्रीपाल जैन यांची वाहतूक नियंत्रकपदी बढती; शाल, श्रीफळ देऊन सत्कार

२८ वर्षांच्या उत्कृष्ट सेवेचा गौरव; तारळे (पाटण) येथे मिळाली नियुक्ती


स्थैर्य, फलटण, दि. १८ सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या फलटण आगारात तब्बल २८ वर्षे उत्कृष्ट सेवा बजावणारे ज्येष्ठ वाहक श्री. श्रीपाल जीनदास जैन यांना वाहतूक नियंत्रक म्हणून बढती मिळाली आहे. त्यांची नियुक्ती तारळे (ता. पाटण) येथे करण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल फलटण आगाराच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभासाठी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री. शीवलाल गावडे, फलटण आगार स्थानक प्रमुख श्री. राहुल वाघमोडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. धीरज अहीवळे, श्री. बाबा मांढरे, वरिष्ठ लिपिक श्री. लहू चोरमले यांच्यासह फलटण आगारातील अनेक चालक, वाहक आणि कार्यशाळेतील कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी श्री. जैन यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्री. श्रीपाल जैन यांनी आपल्या २८ वर्षांच्या कार्यकाळात प्रवाशांशी सौजन्याने वागून आणि आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवून फलटण आगाराचा नावलौकिक वाढवला. ते केवळ एक कर्मचारी म्हणून नव्हे, तर आगारातील विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्येही नेहमीच सक्रिय योगदान देत असत. सध्या ते जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष म्हणूनही सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांच्या बढतीमुळे आगारातील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!