
दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन आंबेडकरी चळवळीत तळागाळातील उपेक्षित, दुर्लक्षित समाज बांधवांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी झालेल्या फळसप गावचे आदर्श व्यक्तिमत्त्व व आंबेडकरी चळवळीतील जुन्याजाणत्या कार्यकर्त्या, त्याचप्रमाणे सम्यक कोकण कला संस्था, महाराष्ट्र (रजि.) या संस्थेचे जेष्ठ सभासद, सुप्रसिद्ध गायक सिद्धार्थ साळवी यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई सोनू साळवी, मु. गाव फळसप, म्हासळा, जिल्हा रायगड यांच वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
मनमिळाऊ, सर्वसमावेशक व आदरणीय व्यक्तीमत्व, आदर्श माता म्हणून लक्ष्मीबाई याना समाजात मनाचे स्थान होते, त्यांच्या अचानक जाण्याने समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे, त्यांच्यामागे आदर्श मुलगा, सून, नातवंडं असा परिवार आहे.
त्यांचा जलदान विधी व शोकसभेचा कार्यक्रम बौद्धजन पंचायत समिती, शाखा क्र. ८२८ च्या अधिपत्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, डी. मार्टच्या मागे, सेन्सरी गार्डन समोर, जुईनगर येथे करण्याचे ठरविले, सदर कार्यक्रमास कालकथित लक्ष्मीबाई सोनू साळवी यांस श्रद्धांजली अर्पण करण्यास समाजातील विविध स्तरातील मान्यवर, साहित्यिक, कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी सदर कार्यक्रमास उपस्थिती लावून कालकथित लक्ष्मीबाई सोनू साळवी यांस श्रद्धांजली अर्पण करावी असे आव्हाहन बौद्धजन पंचायत समिती, शाखा क्र. ८२८ वतीने करण्यात आले आहे.