दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑगस्ट २०२२ । मुंबई । आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते, बौद्धजन पंचायत समितीचे उपकार्याध्यक्ष, बौद्धजन सहकारी पतसंस्थेचे सरचिटणीस, बौद्ध समाज सेवा संघ, मंडणगड या संस्थेचे विश्वस्त, तसेच मौजे वाकवली गाव ता. मंडणगड, जिल्हा रत्नागिरी या गावचे सुपुत्र कालकथित चंद्रकांत दगडू जाधव उर्फ सी.डी. जाधव, सहकाररत्न यांचे नुकतेच के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ६८ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
झुंजार कर्तृत्व व आदर्श व्यक्तिमत्व असलेले सी.डी. जाधव हे चळवळीतील कणखर, आदर्श व वैचारिक वारसा असलेले व्यक्तिमत्व, ते प्रेमळ, मनमिळावू व सर्वसमावेशक स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते.
त्यांचा पुण्यानुमोदन व शोकसभा कार्यक्रम रविवार दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठीक दहा वाजता शहिद स्मारक सभागृह, रमाबाई कॉलनी, घाटकोपर, येथे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक २८६ चे उपाध्यक्ष बबन सखाराम साळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे, सदर कार्यक्रमाला पूज्य भन्ते लंकानंदजी (थेरो) श्रीलंका, तसेच बौद्धजन पंचायत समितीचे आदरणीय सभापती आनंदराज आंबेडकर साहेब, उपसभापती विनोदजी मोरे साहेब, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत साहेब, सरचिटणीस राजेश घाडगे साहेब तसेच समितीचे व्यवस्थापन मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहेत, तरी बौद्धजन पंचायत समितीच्या व्यवस्थापन मंडळ आणि सर्व शाखांच्या विविध कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या आदर्शाला श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती शाखा क्रमांक २८६ व जाधव कुटुंबियांच्या वतीने तसेच बौद्धजन पंचायत समितीद्वारे व मंडणगड विकास मंडळाद्वारे काढलेल्या परिपत्रकात करण्यात आली आहे.