
स्थैर्य, सातारा, दि. 14 नोव्हेंबर : छोट्या चणीच्या ऐश्वर्या जाधवने तन्वी जाधव, सोहा शेख, तनुजा गायकवाड यांना निर्णायक वेळी दिलेली मौल्यवान साथ व नोंदविलेल्या अचूक बास्केटमुळे सातारा इंलिश मीडियम स्कूलच्या (एसईएमएस) संघाचे आत्मबळ वाढले आणि संघाने राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. रोमहर्षक झालेला अंतिम सामना जिंकताच छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात खेळाडूंनी जल्लोष केला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे आयोजिलेल्या या स्पर्धेतील 17 वर्षांखालील गटातील मुलींचा अंतिम सामना एसईएमएस आणि पुण्याच्या सरदार दस्तूर नोशेरवान गर्ल्स हायस्कूल यांच्यात झाला. पहिल्या दहा मिनिटांच्यासत्रात दस्तूरच्या उंचापुर्या वैष्णवी परदेशी हिने युक्ता पिल्ले हिच्या साथीने संघास 19-13 अशी सहा गुणांची आघाडी मिळवून दिली. या सत्रात तन्वी जाधवने आक्रमणावर भर देत दस्तुरच्या खेळाडूंचे फाऊल काढत दहा गुण नोंदविले. मध्यंतराचा खेळ सुरूझाल्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू बास्केट करण्याचा अटोकाट प्रयत्न करीत होते; परंतु त्यात त्यांना यश लाभत नव्हते. या सत्रात 26-16 असा गुणफलक होता. त्यामध्ये दस्तूरने सात गुण, तर एसईएमएसने तीन गुण नोंदवले होते. दस्तूर संघाने दहा गुणांची आघाडी घेतल्याने यजमान एसईएमएसच्या खेळाडूंसह सातारकर प्रेक्षकांमधील आत्मविश्वास ढळमळीत झाल्याचे चित्र मैदानावर होते.
एसईएमसमधील छोट्या चणीच्या सामन्याचे तिसरे सत्र सुरू होताच ऐश्वर्या जाधवने श्री पॉइंटर नोंदवतप्रशिक्षक रोहन गुजर यांचा आत्मविश्वास सार्थकी ठरवला. त्यानंतर मेघा, सोहा, तन्वी यांनी आक्रमण व बचावावर भर दिला. परिणामी, दस्तूरच्या मुलींचा संघ छोट्याछोट्या चुका करू लागला. त्याचा फायदा उठवत एसईएमएसच्या खेळाडूंनी धडाधड बास्केट नोंदविले. तिसर्या सत्राअखेर एसईएमएसने 15 गुण, तर दस्तूरला नऊ गुण नोंदविता (31-36 गुणफलक) आले. घरच्या मैदानावर खेळणार्या एसईएमएसच्या खेळाडूंचे कौशल्य अखेरच्या सत्रात ऐश्वयनि नोंदविलेले अचूक वास्केटस् बहरले. तन्वी, मेघा यांच्याबरोबरच प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्या मिळवून गेले. यामुळे आत्मबळ वाढलेल्या एसईएमएसच्या संघाने केली. विजेत्या संघात अनुष्का चाळके, दस्तूरवर 55-44 अशी गुणांची मात सृष्टी पवार, श्रुतिका रोकडे, निहारिका कदम, मुग्धा घाडगे, सोहा शेख, मेघा जाधव, नायला इनामदार, तन्वी जाधव, तनुजा गायकवाड, ऐश्वर्या जाधव, वृंदा नारकर यांचा समावेश होता.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभकोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, निवड समितीचे सदस्य उदय जाधव, शत्रुघ्न गोखले, मुग्धा अग्रवाल, पालिकेच्या माजी उपाध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, शिवछत्रपती पुरस्कार एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा विजेत्या प्राची थत्ते- वेलणकर, अजिंक्य अर्निका गुजर-पाटील, मुख्याध्यापिका मिथिला गुजर, प्रशिक्षक रोहन गुजर, जिज्ञासा गुजर, तन्मय कोकरे, दस्तूरचे स्नेहल शेळके, रवी पाटील आदी प्रशिक्षक ललित नाहटा, क्रीडाधिकारी उपस्थित होते.

