
स्थैर्य, सातारा, दि. 15 नोव्हेंबर : सातारा शहरातील बाजारपेठा,फळबाजार, अन रस्त्यावरील ठेल्यांवर मोठ्या प्रमाणात कृत्रिमरीत्या पिकविलेल्या केळ्यांची विक्री सुरू असून, अन्न व औषध प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. रासायनिक द्रव्यांच्या सहाय्याने पिकविली जाणारी ही केळी आरोग्यास घातक ठरत असून, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांवर परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून मात्र नियमित तपासण्या केल्या जात असल्याचे सांगण्यात येते; परंतु प्रत्यक्षात बाजारपेठांमध्ये रासायनिक पद्धतीने पिकविलेली केळी खुलेपणाने विकली जात असल्याचे वास्तव आहे. नैसर्गिक पिकलेली केळी पिवळसर अन सुगंधी असतात, त्यांच्या देठावर हिरवट छटा असते. तर रासायनिक पद्धतीने पिकविलेली केळी एकसारखी पिवळी, परंतु गंधहीन व पृष्ठभागावर काळे डाग दिसतात.”नागरिकांनी अशा विक्रीविरोधात आवाज उठवून प्रशासनाने
तातडीने तपास मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.
“कॅल्शियम कार्बाईडसारख्यारासायनिक पदार्थान पिकविलेल्या केळ्यांमुळे पचनाचे विकार, त्वचारोग, अन श्वसनासंबंधी त्रास होऊ शकतो. अशा फळांवरील नियंत्रणासाठी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी.”शहरातील एका ग्राहकाने सांगितले, – “दररोजच्या वापरासाठी आम्ही घेतलेली केळी दुसऱ्याच दिवशी काळी पडतात. नैसर्गिक चवही राहत नाही.डॉ. प्रियांका पाटील, आहारतज्ज्ञ

