दैनिक स्थैर्य | दि. २४ जून २०२३ | फलटण |
एस.टी. महामंडळाने राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत सर्व बसस्थानकावर स्वच्छता, सुशोभिकरण, प्रवाशांना स्वच्छ बसेस पुरवणे असा कार्यक्रम वर्षभर राबवण्यात येणार आहे. रा. प. फलटण बसस्थानकावर फलटणमधील प्रसिद्ध जोशी हॉस्पिटल प्रा. लि. संचलीत फलटण रोबोटिक्स सेंटर यांच्या सौजन्याने ‘आपलं फलटण बसस्थानक’ असा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन जोशी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. प्रसाद जोशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
याप्रसंगी आगार व्यवस्थापिका वासंती जगदाळे, स्थानकप्रमुख राजेंद्र वाडेकर, प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल गावडे सर, भूलतज्ञ डॉ. शरद धायगुडे, वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुखदेव अहिवळे, माऊली कदम, अझहर मुजावर, विवेक शिंदे, सुनील बोद्रे, संजय टाकळे उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने डॉ. प्रसाद जोशी यांचा शाल, गांधी टोपी, बुके देऊन सत्कार करण्यात आला. शिवलाल गावडे सर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. माऊली कदम यांनी सेल्फी पॉईंटकरीता विशेष प्रयत्न केले.
सेल्फी पॉईंटमुळे फलटण बसस्थानकाच्या सौंदर्यात भर पडल्याचे आगार व्यवस्थापिका वासंती जगदाळे यांनी सांगून सौजन्याबद्दल डॉ. प्रसाद जोशी यांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्रीपाल जैन यांनी केले.