दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२३ | फलटण |
दुधेबावी (ता. फलटण) येथील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उदय हणमंतराव सोनवलकर पाटील यांची राज्य शासनाच्या भूमापन अधिकारी पदावर निवड झाली असून या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
दरम्यान, दुधेबावी व पंच क्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ सोनवलकर यांच्या हस्ते फेटा बांधून शाल, श्रीफळ देवून पुष्पहार घालुन उदय सोनवलकर पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ विशेषत: उत्तम सोनवलकर, निलेश खताळ, दत्तात्रय धायगुडे, हणमंतराव सोनवलकर पाटील, संजय सोनवलकर, सचिन सोनवलकर उपस्थित होते.
पोलिस पाटील संघटनेचे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष व दुधेबावी गावचे पोलिस पाटील हणमंतराव सोनवलकर पाटील यांचा उदय सोनवलकर पाटील हा द्वितीय सुपुत्र असून ज्येष्ठ सुपुत्र अक्षय सोनवलकर पाटील, अॅड. अक्षय सोनवलकर पाटील हे फलटण व सातारा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात.