
दैनिक स्थैर्य | दि. ७ एप्रिल २०२३ | फलटण |
सोनके (ता. कोरेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी शौर्य अमोल धुमाळ याने ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत डिफेन्स प्रवर्गातून राज्यात अठरावे स्थान प्राप्त करून चंद्रपूर सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळविला आहे.
भारतीय संरक्षण दलात अधिकारी होऊ पाहणार्या मुला-मुलींना केंद्रीय रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत सैनिक स्कूल सोसायटी देशात ३३ सैनिक शाळा चालवते. या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा अवघड मानली जाते. या परीक्षेत सुमारे २ लाख विद्यार्थी दरवर्षी सहभागी होतात. शौर्य धुमाळ याने या परीक्षेत ३०० पैकी २४८ गुण मिळविले आहेत.
शौर्यच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्याच्या या यशामागे त्याची आई-वडील, विद्या लेंभे, संतोष लेंभे, श्रीकांत साळुंखे, साळुंखे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार यांनी शौर्यचे अभिनंदन केले आहे.