संगीता भोईटे यांची गुणवंत कामगार असोसिएशनच्या विभागीय सदस्यपदी निवड


दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील राजकीय वारसा असलेल्या आरडगावच्या सौ. संगीता धनंजय भोईटे यांची राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या कोअर कमिटीवरती विभागीय सदस्यपदी निवड झाली आहे. विभागीय सदस्यपदी निवड झालेल्या या सातारा जिल्ह्यातील पहिल्याच महिला सदस्या आहेत.

यापूर्वीही त्यांना अनेक जिल्हा व राज्य पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यासाठी त्यांना श्री. सुरेश केसकर, जिल्हाध्यक्ष श्री. अशोकराव जाधव, कामगार कल्याण मंडळ सांगलीचे श्री. घाडगे, श्री. कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या निवडीबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माथाडी कामगार नेते आ. शशिकांत शिंदे, जावलीचे माजी सभापती श्री. मोहनराव शिंदे, श्रीराम बाजारचे माजी चेअरमन महादेवराव पवार, चेअरमन जितेंद्र पवार, व्हा. चेअरमन व सद्गुरू संस्था समूहाचे संस्थापक श्री. दिलीपसिंह भोसले, फलटणच्या नगरसेविका अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले, बिल्डर असोसिएशनचे राजेंद्र कापसे, सर्व राज्य कमिटी सदस्य आदींनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.


Back to top button
Don`t copy text!