दुधेबावीचे सागर नाळे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ मार्च २०२२ । गोखळी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुधेबावी तालुका फलटण येथील सागर अशोक नाळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा २०१९ मध्ये झाली होती. परंतु परीक्षेचा निकाल नुकताच ८ मार्च रोजी जाहीर झाला. यामध्ये सागर नाळे यांची निवड झाली.

नाळे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वाजेगाव ( ता.फलटण), माध्यमिक शिक्षण जय भवानी हायस्कूल तिरकवाडी त्यानंतर शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर येथून डिप्लोमा केला. पुढे डी के.टी.ई टेक्सटाइल आणि इंजिनियरिंग इन्स्टिट्यूट इचलकरंजी मधून संगणक अभियांत्रिकी ही पदवी मिळवली.

सागर नाळे यांचे चुलते प्रकाश बापुराव नाळे हे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असल्यामुळे प्रशासकीय सेवेत जावून समाजाची सेवा करण्याची आवड पहिल्यापासून होती. मनात निश्चित करुन पुढे पुणे येथे जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून परीक्षा दिली. पूर्व व मुख्य या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होऊन शारीरिक चाचणीची तयारी लक्ष्य करिअर ॲकॅडमी पुणे येथे केली. कोरोना साथीच्या काळ असल्याने परिक्षा २०१९ झाली तरी शारीरिक चाचणी व्हायला २०२१ नोव्हेंबर महिना उजाडला, असे सागर नाळे यांनी सांगितले.

लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच आठ मार्च रोजी जाहीर होऊन त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. या निवडीबद्दल दुधेबावी आणि पंचक्रोशीतून सागर नाळे यांचे अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!