जिजाऊ करिअर सेन्टर ची रुपाली गरगडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२३ । बारामती । बारामती तालुका मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ करिअर सेंटर अभ्यासिका ची विद्यार्थ्यांनी   रूपाली राजेंद्र गरगडे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये ऊत्तीर्ण होऊन पोलीस खात्यातील पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.तिच्या निवडीबद्दल बारामती तालुका  मराठा सेवा संघ, जिजाऊ भवन यांच्या वतीने सत्कार समारंभ चे आयोजन करण्यात आले होते या वेळी अध्यक्ष नामदेवराव तुपे, विश्वस्त देवेंद्र शिर्के,प्रदीप शिंदे व इतर मान्यवर  व विद्यार्थी ब,विद्यार्थ्यांनी उपस्तीत होत्या.जिरेगाव येथील शेतकरी कुटुंबातील असलेली रुपाली हिने जिजाऊ करिअर सेंटर च्या अभ्यासिका च्या माध्यमातून अभ्यास करत व तयारी केली  व उत्तीर्ण झाली. जिजाऊ करिअर सेंटर मध्ये उपलब्ध असलेले स्पर्धा परीक्षेतील सर्व पुस्तक संच, इंटरनेट सेवा ,इंग्रजी संभाषण वर्ग, व अभ्यास करण्यासाठी शांत  व पोषक वातावरण , आदी कारणाने स्कोरिंग वाढून उत्तीर्ण होण्यास मदत झाली व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां साठी शहरी भागात  जिजाऊ करिअर सेन्टर ची  अभ्यासिका म्हतपूर्ण असून योग्य वेळी योग्य उपयोग होत असल्याने यश मिळण्यास सहकार्य होत असल्याचे सत्काराला उत्तर देताना  रुपाली गरगडे हिने सांगितले.जिजाऊ करिअर सेंटर च्या अभ्यासिका चा वापर करून स्पर्धा परीक्षा मध्ये ग्रामीण भागातील टक्का वाढण्यास मदत होणार असल्याचे अध्यक्ष नामदेवराव तुपे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!