स्थैर्य, कातरखटाव, दि.२०: अपुरी साधने व त्रोटक मार्गदर्शनाखाली एकलव्याचा एकाग्रतेने यशाची शिखरे पादाक्रांत करत दुष्काळी खटाव तालुक्यातील सुर्याचीवाडी च्या प्राजक्ता पानस्कर ने पहिल्याच प्रयत्नात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( एम्स ) च्या नर्सिंग ऑफिसर पदाला गवसणी घालत तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी : कातरखटाव -मायणी रस्त्यावर एक हजार लोकवस्ती असणारे सुर्याचीवाडी हे गाव. येथील वारकरी सांप्रदयाचा वारसा असणाऱ्यां रंगराव पानस्कर यांची नात व बनपुरी च्या जि. प.शाळेचे उपशिक्षक दत्तात्रय पानसकर यांची कन्या प्राजक्ता ने अकलूज च्या विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज मधून नुकताच नर्सिंग चा कोर्स पूर्ण केला आणि केंद्र शासनाच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एमस) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेला सामोरी जात बुद्धी कौशल्याच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात ९८.४५ टक्के गुण मिळवून देशात १५१४ वी रँक प्राप्त करत सुयश संपादन केले.तिची नर्सिंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे.
तिचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील,माजी आमदार प्रभाकर घार्गे,रणजितसिंह देशमुख, नंदकुमार मोरे,कल्पना खाडे,संदीप मांडवे,धनंजय चव्हाण, चंद्रकांत मोरे, कांत फडतरे, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे,लक्ष्मण पिसे,तुकाराम यादव,रफिक मुलाणी,आप्पासाहेब शिंगाडे,तेजस्वी पवार,दिलीप पाटोळे,दत्ता कदम,बाळासाहेब काळे,गुलाबराव पाटील,गोरख इंदलकर,डॉ.चंद्रशेखर नांगरे,डॉ.आकाराम बोडकेआदींसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.