अमेरिका येथे होणार्‍या एमडीआरटी आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी प्राजक्ता गांधी यांची निवड


दैनिक स्थैर्य | दि. २६ डिसेंबर २०२३ | बारामती |
बारामती शाखेतील महिला विमा प्रतिनिधी प्राजक्ता गांधी यांना एमडीआरटी होण्याचा बहुमान सलग तिसर्‍यांदा प्राप्त झाला आहे.

२००७ पासून त्या २००० पेक्षा जास्त विमाधारकांना उत्कृष्ट ग्राहक सेवा देतात. कौटुंबिक जबाबदारी बरोबरच त्यांनी विमा व्यवसायातही भरीव कामगिरी केली आहे. महिला असून सुद्धा पुरूषांच्या बरोबरीने त्यांनी काम करत विविध पॉलिसीच्या माध्यमातून विमा ग्राहकांना उत्तम सेवा दिली आहे. ग्रामीण भाग ते शहरी भाग, बालक ते ज्येष्ठ व्यक्ती हे पॉलिसी ग्राहक असून विशेषतः महिला ग्राहकांना व बचत गटाच्या अनेक महिलांना शिक्षण, विवाह आदी साठी उत्तम पॉलिसी देत विश्वास जिंकला आहे.

याकामी त्यांना बारामती शाखेतील शाखाधिकारी हेमंत जोशी व एलआयसी असोसिएट तुकाराम पवार यांचे मार्गदर्शन लाभले.


Back to top button
Don`t copy text!