दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण (जि. सातारा) येथील पूनम भिसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडियाच्या प्रदेश सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते भिसे यांना नियुतीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी ना. अजितदादा व खा. तटकरे यांनी पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे आचार-विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण काम कराल, अशी अपेक्षा पूनम भिसे यांच्याकडे व्यत करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.