फलटणच्या पत्रकारांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २ : दैनिक सकाळचे शहर प्रतिनिधी किरण बोळे, सा.नमस्ते फलटण चे उपसंपादक राजकुमार गोफणे, दैनिक सम्राटचे पत्रकार विकास अहिवळे व  युवा जनमत चे संपादक व दैनिक मुक्तागिरी पत्रकार युवराज पवार,  यांची शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

किरण बोळे हे नेहरु युवा मंडळ व पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिकसह विविध क्षेत्रातील प्रश्‍न विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यरत राहिले आहेत. तसेच सामाजिक ,शैक्षणिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे. तसेच ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदूमाधव जोशी यांनी उभारलेल्या ग्राहक चळवळीतही ते कार्यकर्ता म्हणून गेली काही वर्षे काम करीत आहेत. आजवर त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे.

जावली ता फलटण येथील पत्रकार तथा सा.नमस्ते  फलटण चे उपसंपादक  राजकुमार आप्पासो गोफणे हे गेली 20 वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यरत आहेत. सामाजिक ,शैक्षणिक कार्यात ही सहभागी होवून सतत कार्यरत असतात.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे.

विकास अहिवळे हे पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिकसह विविध क्षेत्रातील प्रश्‍न विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यरत राहिले आहेत. तसेच सामाजिक ,शैक्षणिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे.आजवर त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे.

युवराज पवार हे गेली 10 वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून विविध प्रश्‍न सोडविण्यात अग्रेसर आहेत. महाराजा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन सामाजिक व राजकीय कार्यात ते सहभागी होवून सतत कार्यरत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे.

पत्रकार क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे . त्यांना शासनाकडून नियुक्तीचे पत्र देण्यात आले असून आगामी काळात तळागाळातील सर्व सामान्य लोकांना घटक मानून यापुढेही कार्यरत रहाणार असल्याचे पत्रकार किरण बोळे, राजकुमार गोफणे, विकास अहिवळे, युवराज पवर यांनी सांगितले. या निवडीबद्दल फलटण वृत्तपत्र क्षेत्र व विविध स्तरामधुन यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!