
दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२२ । फलटण । केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयातर्फे घेतलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. नवोदय परीक्षेसाठी एकूण आठ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय, सातारा येथे निवड झालेली आहे. त्यामुळे शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याची परंपरा यावर्षीही सरस्वती शिक्षण संस्थेने कायम ठेवली आहे. यामध्ये मास्टर. वेदांत विशाल आंधळकर,व मास्टर आदित्य हिरामण साबळे, जवाहर जवाहर नवोदय विद्यालय, सातारा येथे निवड झालेली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी,त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थचे अध्यक्ष श्री. प्रदीप माने, संस्थचे सचिव श्री.विशाल पवार, व्यवस्थापकिय संचालिका सौ. संध्या गायकवाड,कोषाध्यक्षा सौ.सविता माने, संचालिका सौ. प्रियांका पवार, प्राचार्य श्री.संदीप किसवे, पर्यवेक्षक श्री.अमित सस्ते, समन्वयिका सौ. माधुरी काटकर, सौ.सुवर्णा निकम, श्रीमती योगिता सस्ते, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.