शासकीय तंत्रनिकेतनच्या दोनशहून अधिक विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड


दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२२ । सातारा । राज्य शासनाच्या तंत्र शिक्षण संचालनालयाद्वारे संचालित कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेतील अंतिम वर्षाच्या सुमारे 200 हून अधिक विद्यार्थ्यांची 2021-22 या शैक्षणिक वर्षात कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून अनेक नामांकित औद्योगिक आस्थापनांमध्ये निवड झाली असल्याची माहिती  शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.

तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, विभागीय सहसंचालक डॉ. डी.व्ही. जाधव यांच्या मार्गदशन व प्रोत्साहन तसेच शिक्षकांचे परिश्रम यामुळेच हे शक्य झाले असल्याचे सांगून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदनही श्री. पाटील यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!