दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२२ । मुंबई । इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी लर्निंग हब (आयटीएलएच) या विद्यार्थ्यांना कोडिंग स्किल्स व डिझाइन (यूआययूएक्स) मधील निपुणता आत्मसात करण्यास मदत करणा-या झपाट्याने विकसित होत असलेल्या इनक्यूबेटरने नुकतेच सुवर्ण यश संपादित केले आहे, जेथे त्यांच्या २६ विद्यार्थ्यांना देशातील काही प्रतिष्ठित तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये रिक्रूट करण्यात आले आहे. या यशोगाथेमधून विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले तंत्रज्ञानाचे ज्ञान व कौशल्य दिसून येते. बायजू’ज, अॅसेन्चर, टेक महिंद्रा व फ्लिपकार्ट यांसारख्या सुप्रसिद्ध, उद्योगातील अग्रणी कंपन्यांनी आयटीएलएचच्या तंत्रज्ञान इनक्यूबेटरमधून त्यांच्या निपुण व्यावसायिकांची निवड केली आहे.
आयटीएलएचचे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अॅलेक्स जॉर्ज म्हणाले, “भारतीय तंत्रज्ञांमधील लुप्त कलागुणांना चालना देऊन उत्तम कंपन्यांमध्ये त्यांच्या करिअरला वाव देण्याची आमचे मुख्य ध्येय आहे. आमच्या ब-याच विद्यार्थ्यांनी स्वत:चे ध्येय संपादित केले आहे, ते म्हणजे कौशल्य वाढवून उत्तम नोकरी मिळवणे. आमच्या उपक्रमाने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. द्वितीय श्रेणीच्या शहरांमधील अनेक विद्यार्थ्यांनी अपवादात्मकरित्या उत्तम कामगिरी करण्यासोबत आयटीएलएचमधील त्यांचे कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांची ध्येये संपादित केल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे. मी आशा करतो की, विद्यमान बॅच त्यांच्या सहका-यांनी केलेल्या कामगिरीमधून अधिक प्रेरणा घेईल आणि ते देखील त्यांच्या उद्देशांप्रती सर्वोत्तम प्रयत्न करतील.”
आयटीएलएचचा यूआय/यूएक्स कोर्स उत्पादन डिझाइनर्स, व्हिज्युअल डिझाइनर्स, डिजिटल मार्केटर्स, उद्योजक, उत्पादन प्रमुख, ग्राफिक अॅनालिटिक्स, यूआय डिझाइनर्स, यूएक्स डिझाइनर्स, यूएक्स कन्सल्टण्ट्स, यूएक्स राइटर्स, क्रिएटिव्ह डिझाइनर्स, ग्राफिक अॅनालिटिक्स, मोशन डिझाइनर्स, यूएक्स संशोधक व उत्पादन व्यवस्थापकांसाठी प्रयोगात्मक अध्ययन व व्यावसायिक कौशल्य विकास देण्यावर लक्ष केंद्रित करतो. व्यासपीठाने कोर्ससाठी ४५ टक्के पुरूषांच्या तुलनेत ५५ टक्के महिलांची नोंदणी केली आहे.
या यशस्वी उमेदवारांपैकी एक आहे पुण्यातील शर्वरी उमेश पाटील. तिने उत्तम कामगिरी केली आणि त्यांच्या कठोर परिश्रमाचा व आयटीएलएचच्या यशस्वी प्रशिक्षणाचा फायदा घेतला आहे. तिला बायजू’जमध्ये इलेस्ट्रेटर व यूआय डिझाइनर म्हणून काम मिळाले आहे. पुण्यातील एकूण १० विद्यार्थ्यांना प्रतिठित कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे.