
स्थैर्य, फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सरलष्कर बहाद्दर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर विद्यालयाच्या कुमारी गीतांजली शेलार व श्वेता सांगळे या विद्यार्थिनींची जवाहर नवोदय विद्यालय साठी निवड झाली आहे. जिल्हा नवोदय परीक्षा निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये हनुमंतवाडी ता.फलटण येथील श्रीमंत बाबाराजे खर्डेकर विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणार्या गीतांजली शेलार व श्वेता सांगळे यांची निवड करण्यात आली आहे. हनुमंतवाडीचे सरपंच विक्रमसिंह जाधव, मुख्याध्यापक शेडगे यांच्यासह पालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या दोघांचे अभिनंदन केले.