दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२३ | फलटण |
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील माजी विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक गट ‘ब’ पदाची परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा अंतर्गत श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय येथील माजी विद्यार्थिनी कुमारी शितल उत्तेकर (मु. पो. भिमानगर, ता. माढा, जि. सोलापूर) व कृषि महाविद्यालय फलटण येथील माजी विद्यार्थिनी कुमारी सुप्रिया आढाव (मु. पो. जावली, ता. फलटण, जि. सातारा) व कुमार रोहित जाधव (मु. पो. कोळविहीरे, ता. पुरंदर, जि. पुणे) या माजी विद्यार्थ्यांनी पोलीस उपनिरीक्षक गट ‘ब’ पदी निवड मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. सदरील परीक्षेसाठी महाविद्यालयातील स्पर्धा मंचचे मार्गदर्शन लाभले.
या निवडीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सातारचे माजी अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे मे. गव्हर्निंग कौंसिलचे सभासद सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, अधिक्षक श्री. श्रीकांत फडतरे, प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे व स्पर्धा मंचचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.