
दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२२ । फलटण । मराठा सामाजिक संस्था उद्योग आणि सहकार विभाग महाराष्ट्र राज्य प्रमुख सल्लागारपदी प्रसिद्ध बँकर दिलीप गुजर यांची निवड जाहीर झाली असून या नियुक्तीबद्दल दिलीप गुजर (धरु) यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
मराठा सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष भास्कर सुर्वे, प्रमुख कार्यवाह संदीप भोसले, अनिल कदम, उद्योग आणि सहकार विभाग महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय नलावडे, उपाध्यक्ष, मिलिंद राणे, सचिव प्रदीप मोरे, सहसचिव नथुराम जाधव, सौ. अश्विनी भोसले, खजिनदार संजय सावंत, सदस्य प्रभाकर सावंत, सुशांत जाधव वगैरे कार्यकारणी सदस्यांनी दिलीप गुजर (धरु) यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी बोलताना प्रमुख कार्यवाह संदीप भोसले म्हणाले, दिलीप गुजर (धरु) यांनी गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात समाज बांधव प्रतिनिधी, पदाधिकारी यांचे संघटन बांधणी केली आहे. विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. अनेक वर्ष बँकिंग आणि सहकार क्षेत्रात ते उत्तम प्रकारे कार्यरत आहेत.
सातारा शहरात प्रसिद्ध बँकर म्हणून यापूर्वी कार्यरत असलेले दिलीप गुजर (धरु) यांची या नव्या पदावर निवड होताच विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.