मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेसाठी मुधोजी महाविद्यालय, फलटणच्या खेळाडूंची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । फलटण । सातारा जिल्हा अँमँच्युअर अँथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने दि. २३ व २४ जुलै २०२२ रोजी सासवड ( फलटण ) येथे झालेल्या सातारा जिल्हास्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय , फलटणच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करीत विविध वयोगटातील खेळप्रकारात यश संपादन केले. यामधे कु.मनिष द्वारिका यादव १८ वर्षे वयोगटात ८०० मी धावणे प्रथम क्रमांक , आणि ४०० मी. धावणे द्वितीय क्रमांक , कु. गणेश दशरथ काशिद १८ वर्षे वयोगटात २०० मी.धावणे प्रथम क्रमांक , कु. मंदार मनोज शिंदे २० वर्षे वयोगटात ४०० मी. हर्डल्स धावणे. द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या तिन्ही खेळाडूंचे दि.१९ ते २१ आँगस्ट २०२२ या कालावधीत मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे . तसेच कु. बापू दत्ताञय तरडे २० वर्षे वयोगटात ८०० मी. धावणे तृतीय क्रमांक , कु. प्रणव महादेव बिचुकले २० वर्षे वयोगटात ४०० मी. धावणे तृतीय क्रमांक मिळविला. या खेळाडूंना मुधोजी महाविद्यालय, फलटणचे कनिष्ठ विभाग जिमखाना प्रमुख प्रा.टी.एम. शेंडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी खेळांडूचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सातारा जिल्ह्याचे नेते व फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण चे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅंकेचे चेअरमन व संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फ. ए.सो. क्रीडा समितीचे अध्यक्ष व ग.कौ. सदस्य श्री . शिवाजीराव घोरपडे, फ.ए.सो.चे प्रशासन अधिकारी श्री .अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, मुधोजी महाविद्यालय, फलटणचे प्रभारी प्राचार्य डाँ.पी.एच कदम, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डाँ. एस. जी.दिक्षित , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.एस. आर . वेदपाठक, क्रीडा समिती सचिव प्रा. सचिन धुमाळ, सदस्य श्री.महादेव माने व क्रीडा समितीचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले.आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!