
दैनिक स्थैर्य । दि. ३० जानेवारी २०२३ । सासकल । फलटण तालुक्यातील सासकल येथील विजय मुरलीधर मुळीक यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये निवड झाली असून या निवडीबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी दिनेश दत्तात्रय मुळीक, प्रणव किसन पवार, विजय मुरलीधर मुळीक उपस्थित होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अजित मुरलीधर मुळीक यांनी प्रयत्न केले. वडील मुरलीधर मुळीक, आई लता मुळीक हे शेती करत असून अतिशय मेहनती व कष्टाळू आहेत व भाऊ विजय हा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारची कार्यालये, उपक्रम, अशा सर्व आस्थापनांचे कर्मचारी आणि महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना अधिक चांगले संरक्षण आणि सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC) ही एक कॉर्पोरेट संस्था आहे, ज्याचे प्रमुख पोलीस महासंचालकांचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी करतात.
अजित मुरलीधर मुळीक यांच्या निवडीबद्दल गावचे माजी सरपंच हणमंत गंगाराम मुळीक, लक्ष्मण गणपत मुळीक, सोपान रामचंद्र मुळीक, उज्ज्वला किरण घोरपडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक भानुदास घोरपडे, रघुनाथ गणपत मुळीक, मंगेश संजय मदने, गोरख बाबा मुळीक, भैरवनाथ हॉलीबॉल क्लबचे व्यवस्थापक शिवाजी मुळीक(नाना), मोहनराव रामचंद्र मुळीक (पाटील), जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर बल्लाळ, शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंदे सर, सासकल जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजी हरिभाऊ मुळीक, उपाध्यक्ष विनायक नारायण मदने, प्रमुख सल्लागार भानुदास दिनकर घोरपडे,संघटक अजित पोपट मुळीक(पाटील), प्रवक्ते सोमिनाथ पोपट घोरपडे, शाळा सुधार संघटनचे व्यवस्थापक राहुल साहेबराव मुळीक,महेश मदने, गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले, ग्रामपंचायत सदस्य चांगुणा सर्जेराव मुळीक, सोनाली मंगेश मदने, लक्ष्मी आडके,मोहन नामदेव मुळीक, लता विकास मुळीक व इतरांनी अभिनंदन केले आहे.