श्री. सिध्दनाथ देवस्थान रथोत्सव व यात्रेदरम्यान मायणी शहरात वाहतुकीत बदल


दैनिक स्थैर्य । दि. २३ नोव्हेंबर २०२२ । सातारा । मौजे मायणी ता. खटाव येथील श्री. सिध्दनाथ देवस्थान रथोत्सव व यात्रेदरम्यान मायणी शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.  याकरिता वाहतुकीचे नियोजन योग्यरितीने होण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी  महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ (१) (ब) प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारास अनुसरुन मायणी ता. खटाव येथील श्री. सिद्धनाथ यात्रा दरम्यान यात्रेच्या मुख्य दिवशी दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ०७.०० वा. पासुन ते सायंकाळी २०.०० वा. पर्यंत वाहतूक मार्गात खालील प्रमाणे बदल केले आहेत. 

मल्हारपेठ ते पंढरपूर रोड वाहतुकीसाठी बंद करुन धोंडेवाडी पडळ कारखाना – पडळ फाटा ते पंढरपूर रोड असा पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे.  

तसेच विखळे फाटा-पडळ फाटा-पडळ कारखाना धोंडेवाडी – मायणी चांदणी चौक मार्गे कराडकडे असा रस्ता तयार करण्यात आला आहे. 

तरी वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये कारवाईस पात्र राहतील याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.


Back to top button
Don`t copy text!