
स्थैर्य, खटाव, दि. २८ : जाखणगाव, ता. खटाव येथील येस सेंद्रिय शेतकरी गट सोयाबीन व गहू या मुख्य पिकांमध्ये बीजोत्पादन घेत असून परिसरात बियाणे बदलाची क्रांती झाली आहे. याचा लाभ शेतकर्यांना गुणवत्तायुक्त बियाणे मिळण्यासाठी होत आहे, असे प्रतिपादन जिल्हा बीज प्रमाणीकरण सहाय्यक कृषी अधिकारी ए. डी. यादव यांनी केले.
जाखणगाव येथे कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली येस सेंद्रिय शेतकरी गटच्या माध्यमातून सभासद शेतकर्यांच्या शेतावर पायाभूत 726 या सोयाबीन वाणाचा बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. सोयाबीन पिकाची पाहणी जिल्हा बीज प्रमाणीकरण कार्यालयाचे कृषी सहाय्यक अधिकारी ए. डी. यादव यांनी केली.
यावेळी गटाचे संस्थापक संजय भगत व कृषी सहाय्यक किरण काळे उपस्थित होते.