स्थैर्य, फलटण, दि.१८: आंदरुड ,कुरवली, राजुरी, भवानी नगर, मुंजवडी या सह इतर गावातील शेतकर्यांना चार तास वीज पुरवठा होत आहे. शेतकर्यांच्या शेती पिकाचे उन्हाळ्यात अतोनात नुकसान होत आहे व करोना विषाणू शेतकर्यांवर अनेक संकटे आले आहेत तरी या भागातील वीज पुरवठा तसा ऐवजी आठ तास करण्यात यावा शेतकर्याचा कोणत्या प्रकारचा अंत पाहू नये शेती पंपासाठी लागणारा वीजपुरवठा आठ तासाचा सुरळीत करण्यात यावा न सुरळीत न केल्यास 31 मे पासून या भागातील शेतकर्यांनी बांधवांना घेऊन तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येणार आहे अशी विनंती तालुकाध्यक्ष गावडे यांनी केली.
यावेळी युवा नेते अभिजीत भैया निंबाळकर, भाजप फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नानासो इवरे किसान मोर्चाचे शहराध्यक्ष नितीन वाघ, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ यजगर, कुरवली बुद्रुक चे भाजप नेते धनाजी गावडे, संदीप आढाव, डॉ. राहुल गावडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.