महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ लागू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२२ । सातारा । माहे जानेवारी २०२१ ते माहे मे २०२२ व माहे जुन २०२२ ते माहे सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार   सातारा शहर, सातारा तालुका या पोलीस ठाणेच्या हद्दीत दि.१८ सप्टेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया व दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ नुसार पोलीस अधीक्षक अजकुमार बंसल यांनी   अधिकाराचा वापर करुन, कायदा व सुव्यवस्थेचा बंदोबस्त कामी नेमलेल्या उप विभागीय पोलीस अधिकारी सातारा,पोलीस निरीक्षक सातारा शहर,सातारा तालुका यांचेसह बंदोबस्तावरील अन्य पोलीस अधिकारी /अंमलदार यांना दिनांक १८ सप्टेंबर २०२२ व दिनांक १९ सप्टेंबर २०२२ या कालावधीकरीता त्या-त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणुन वाहनांच्या नियमना संदर्भात, मिरवणुकीच्या मार्गासंबधाने, मिरवणुकीतील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदुषणाचे अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधांचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देणेचे अधिकार प्रदान केले आहेत.


Back to top button
Don`t copy text!