दैनिक स्थैर्य । दि. २३ नोव्हेंबर २०२२ । सातारा । किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्वर येथे शासनाच्यावतीने दि. 30 नोव्हेंबर 2022 रोजी शिवप्रताप दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थ बंदोबस्तासाठी कर्तव्यावर नेमण्यात आलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांचेहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसारचे अधिकार दि. 29 नोव्हेंबर 2022 चे 13.00 वा.पासून ते दि. 1 डिसेंबर 2022 चे 08.00 वा. पर्यंत च्या कालावधीकरिता प्रदान केले आहे.
या अधिकारानुसार त्या त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून मोटार वाहनाच्या नियमना संदर्भात, कार्यक्रमासाठी जाणारे-येणारे मार्गाातील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन/ हालचाल कशी असावी, ध्वनी प्रदूषणाचे अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे अथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.