दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । सातारा । किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्वर या ठिकाणी शासनाच्या वतीने दि. 10 डिसेंबर 2021 रोजी शिवप्रताप दिन साजरा केला जाणार आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी कर्तव्यावर नेमण्यात आलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांचेहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार दि. 9 डिसेंबर 2021 रोजीच्या 13.00 वा.पासून ते 11 डिसेंबर 2021 रोजीच्या 8.00 वा. पर्यंत आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.
या अधिकारानुसार त्या त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणुन मोटार वाहनाच्या नियमना संदर्भात, कार्यक्रमासाठी जाणारे-येणारे मार्गातील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन, हालचाल कशी असावी, ध्वनी प्रदुषणाचे अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने अधिकार प्रदान केले आहेत.