स्थैर्य, सोलापूर, दि.२४: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी तालुका हद्दीमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार कलम 144 लागू केल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.
दि. 16 डिसेंबर 2020 ते 21 जानेवारी 2021 पर्यंत खालीलप्रमाणे आदेश लागू करण्यात आले आहेत.
- पोलीस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सार्वजनिक सभा, मिरवणूक, ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही.
- ध्वनीक्षेपकाचा वापर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतच करता येईल.
- निवडणुकीच्या कालावधीत तीनपेक्षा अधिक वाहनाचा ताफा चालविण्यात येवू नये.
- निवडणूक कालावधीत तहसील कार्यालय, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय परिसर (नवीन शासकीय धान्य गोदाम) व त्यांच्या संरक्षक भिंती पासून 100 मिटरच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत. याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मिरवणूका काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे व गाणी म्हणणे इत्यादी, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यांना बंदी घालण्यात आली आहे.
- मतदान केंद्रापासून 100 मिटर त्रिजेच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची शस्त्रास्त्रे बाळगता येणार नाहीत किंवा शस्त्राचे प्रदर्शन करता येणार नाही.