फलटणमध्ये दुसरा सीएनजी पंप सुरु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील फलटण-दहिवडी रस्त्यावरील झिरपवाडी येथे दुसरा सीएनजी पंप सुरु झाला आहे. याचा लाभ तालुक्यातील ग्राहकांना निश्चितच होईल, असे आश्वासन निलकंठ पेट्रोलियमद्वारे करण्यात आले आहे.

सीएनजी बाबत अधिक माहिती अशी, सीएनजी 20-25 बार म्हणजेच प्रती चौ.मी.ला 25,000 किलोटन दाब देऊन टाकीत भरतात आणि वाहनासाठी इंधन म्हणून वापरतात. या दाबामुळे त्याचा आकार 25 पटीने कमी होतो. सीएनजी हा कोरडा म्हणजे बाष्प नसलेला वायू असल्याने त्याचे ज्वलन होताना कमी बाष्प निर्मिती होते. त्यामुळे त्याची ज्वलनक्षमता वाढते. यात मुख्यत: मिथेन, थोडे इथेन, 5 टक्क्यांहून कमी प्रमाणात प्रोपेन व अत्यल्प प्रमाणात निष्क्रिय वायू असतात. सीएनजी स्वच्छ, गंधहीन व संक्षारण (रासायनिक झीज) न करणारा आहे. सीएनजी पर्यावरणस्नेही असून हे वाहनांचे सर्वांत स्वच्छ इंधन आहे. यात कार्बनाचे प्रमाण कमी आहे. याच्या ज्वलनातून कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डाय-ऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड यांसारखे हरितगृह वायू व इतर प्रदूषके कमी प्रमाणात निर्माण होतात. इंंजिनाची कमीत कमी झीज होते व तेल वरचेवर बदलावे लागत नाही. त्यामुळे वाहनाच्या देखभालीचा खर्च कमी होतो.

सीएनजीच्या साठवण टाक्या अधिक भक्कम व सुरक्षित असतात. यामुळे अपघाताने तो बाहेर पडण्याची शक्यता कमी असते. गळती झाली, तरी तो हवेत झटपट मिसळून जातो. त्यामुळे आग लागणे वा जमिनीचे संदूषण होण्याची जोखीम कमी असते. एंजिनात सीएनजी परत भरताना त्यातून प्रदूषके उत्सर्जित होत नाहीत. सीएनजी एंजिनाचे घटक आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बनत असल्याने त्याचे कार्य सुरक्षित रीतीने चालते. सीएनजी प्रणाली सीलबंद असल्याने त्याचे बाष्पीभवन वा उत्सर्जन होत नाही. एलपीजी व पेट्रोल यांच्या वाफांप्रमाणे सीएनजी खाली बसत नसल्याने तो सुरक्षित ठरतो. तसेच लगेच पेटत नसल्याने सीएनजीची वाहतूक व साठवण कमी धोकादायक असते. प्रवासी वाहने, कचर्‍याच्या गाड्या, माल पोहोचविणार्‍या गाड्या यांसारख्या सार्वजनिक उपभोगाच्या वाहनांच्या दृष्टीने हे विपुलपणे आढळणारे, स्वच्छ ज्वलनाचे व आर्थिकदृष्ट्या परवडणारे सीएनजी हे चलाख इंधनआहे. त्यामुळे दिवसेंदिवस याचा वापर वाढत आहे.


Back to top button
Don`t copy text!