दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२२ । मुंबई । विविध देशांतील मुंबईतील वाणिज्य दूतांची दुसरी वार्षिक परिषद आज मुंबईत पार पडली. या परिषदेस राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीसह सुमारे २० हून अधिक देशांतील वाणिज्यदूत व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राज्यातील उद्योगवाढीसह पर्यावरण, द्विराष्ट संबंध आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
आज मुंबई येथे झालेल्या या परिषदेला मीचल ब्राऊन (ऑस्ट्रेलिया), शमी बाऊकेज (फ्रान्स), यासुकाता फुकाहोरी (जपान), इरिक मॅलमबर्ग (स्वेडन), माईक हँकी (अमेरिका), गुलीमेरो डिवोटो (अर्जेटीना), फ्रँक गिरकेन्स (बेल्जीयम), माईक पॉल (हंगेरी), अहमद झुअेरी युसूफ (मलेशिया), वॅल्सन वेथड (श्रीलंका), अचिम फॅबिग (जर्मनी), तेअरी व्हॅन हेल्डन (नेदरलँड), इको ज्युनोर (इंडोनेशिया) डॅमिक इरझिक (पोलंड), अँड्रीया कौन (साऊथ आफ्रिका), अहमद डेन्क, हुसेन ऐयदीन (तुर्कस्थान) कतारचे वाणिज्य प्रमुख, नार्वेचे राहुल माहेश्वरी आदी उपस्थित होते.