विडणीत घटनास्थळी शोधकार्य सुरूच; सोमवारी धारदार हत्यारे सापडली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ जानेवारी २०२५ | फलटण |
विडणी (ता. फलटण) येथे केलेल्या महिलेच्या निर्घृण खुनाबाबत सोमवारी तिसर्‍या दिवशीही पोलिसांचे शोधकार्य सुरूच होते. सोमवारी मृतदेहाचे हात व धारदार हत्यारे सापडल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, ५०० मीटर परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

विडणी येथील शेतात एका महिलेचा कंबरेखालील अर्धवट मृतदेह व कवटी आढळून आली होती, तसेच पूजेचे साहित्यही सापडले होते. त्यामुळे हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह कवटी व कंबरेखालचा भाग व पोलिस उपअधीक्षक राहुल धस, काल हात सापडला असून, उर्वरित पोलिस निरीक्षक सुनील महाडिक भागाचा अद्यापही शोध सुरू आहे. घटनास्थळी ठाण मांडून आहेत.


Back to top button
Don`t copy text!