ग्रामपंचायत मतदानासाठी कऱ्हाडात मतदान यंत्रे सील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कऱ्हाड, दि.१० : तालुक्‍यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रे तपासणी आणि मतदान केंद्रावर पाठवायची मतदान यंत्रे तयार करण्याची अंतिम कार्यवाही करण्यास आज (रविवार) प्रारंभ झाला. तालुक्‍यातील मोठ्या ग्रामपंचायतीसह 104 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी अर्ज दाखल माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीच्या रणधुमाळीचे चित्र स्पष्ट झाले.

त्यामध्ये तालुक्‍यातील उंडाळे या मोठ्या ग्रामपंचायतीसह कामथी, किरपे, येणके, संजयनगर, वाघेश्वर, लटकेवाडी, म्हारुगडेवाडी, टाळगाव, भुरभुशी, अंबवडे, खोडजाईवाडी, पाचुंद, गोटे, वसंतगड, हणबरवाडी, विरवडे या 17 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. याबराेबरच 30 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी, तर काही ग्रामपंचायतींमध्ये तिरंगी लढत होत आहे.

त्यासाठी मतदान यंत्रे तपासणी आणि मतदान केंद्रावर पाठवायची मतदान यंत्रे तयार करण्याची अंतिम कार्यवाहीस आज (रविवार) प्रारंभ झाला. त्यासाठी स्वतंत्र मशिनची व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली. निवडणूक लढवणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी हे सकाळी दहापासून उपस्थित हाेते. दुपारी चार पर्यंत अधिकारी, कर्मचारी यांची मतदान यंत्रे तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु हाेते. हे काम रात्री उशिरापर्यंत सुरु राहील अशी माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!