तब्बल ९५ लाख थकीत भाडे व कर थकवणाऱ्या छाबडा हायस्कुल व ज्युनियर काॅलेजच्या इमारतीस सील; महाबळेश्वर नगरपालिकेची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२१ । महाबळेश्वर । तब्बल 95 लाख 28 हजार 10 रूपयांच्या थकीत भाडे व कर वसुलीसाठी महाबळेश्वर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या आदेशा नुसार येथील सौ डी एन छाबडा हायस्कुल व ज्युनियर काॅलेजच्या इमारतीस सील ठोकुन ही मिळकत पालिकेने आपल्या ताब्यात परत घेतली भाडे वसुलीसाठी अशा प्रकारे पालिकेची कारवाई करण्याची ही पहीलीच वेळ असल्याने ही धाडसी कारवाई करणारया पालिकेच्या दबंग मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचे शहरातुन कौतुक होत आहे.

छ शिवाजी महराज चैकाजवळ पालिकेचे महात्मा फुले माकेर्टची इमारत आहे या इमारतीच्या तळ मजल्यावर असंख्य दुकान गाळे आहेत तर पहील्या मजल्यावर दोन मोठे हाॅल आहेत पालिकेने एप्रिल 2001 मध्ये पहील्या मजल्यावरील हाॅल कायार्लयीन कामकाजासाठी भाडयाने देण्यासाठी लिलाव जाहीर केला होता या लिलावा मध्ये घनश्याम छाबडा यांनी या दोन्ही हाॅल भाडयाने घेण्यासाठी बोली लावली होती या मध्ये हाॅल क्र 1 साठी 20 हजार 101 भाडे व हाॅल क्र 2 साठी 10 हजार 101 रूपये भाडे देण्याचे घनश्याम छाबडा यांनी मान्य केले होते पालिकेचे हे दोन्ही हाॅल हे कायार्लयीन कामाकाजासाठी हवे असल्याचे सांगुन छाबडा यांनी ते दोन्ही हाॅल लिलाव पध्दतीने आपल्या ताब्यात घेतले होते केवळ कायार्लयासाठीच असलेले दोन्ही हाॅल ताब्यात घेवुन छाबडा यांनी ते हाॅल सौ देविबाई नारायणदास छाबडा ग्रामिण शिक्षण संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी वापर सुरू केला ही बाब पालिकेच्या निदशर्नास आली होती छाबडा यांनी इमारतीच्या वापरातील बदला साठी पालिकेची कोणतीही पुवर् परवाणगी घेतली नाही त्या मुळे छाबडा यांनी पालिके बरोबर केलेल्या कराराच्या अटींचा भंग केला होता त्याच प्रमाणे छाबडा यांनी इमारतीचे भाडे व कर थकविला होता वषार्नुवषेर् ही थकबाकी वाढत चालली होती भाडे व कर वसुलीसाठी पालिका गेली अनेक वषार्ं पासुन छाबडा यांचेकडे तगादा लावला आहे या साठी लेखी नोटीसा देखिल पाठविल्या आहेत परंतु छाबडा यांनी पालिकेचे भाडे व कर भरणा केला नाही अनेक मुख्याधिकारी आले आणि गेले परंतु त्यांनी थकलेले भाडे व कर वसुलीसाठी कागदी घोडे नाचविण्या व्यतिरिक्त काहीही केले नाही परंतु विदयमान मुख्याधिकारी या दबंग गिरीसाठी प्रसिध्द आहेत त्यांनी छाबडाकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर मागार्चा अवलंब केला.

छाबडा यांच्याकडे हाॅल क्र 1 चे 63 लाख 27 हजार 874 रूपये भाडे व कर थकला होता त्याच प्रमाणे हाॅल क्र 2 चे 32 हजार 136 रूपये भाडे व कर थकला होता दोन्ही मिळुन छाबडा यांचेकडे 95 लाख 28 हजार 10 रूपये पालिकेचे थकले होेते मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी 15 सप्टेंबर रोजी छाबडा यांनी थकलेल्या रक्कमेच्या वसुलीसाठी अंतिम जप्ती कारवाईची नोटीस धाडली या नोटीस मध्ये थकलेली सवर् रक्कम सात दिवसांच्या आत पालिकेकडे भरणा करून पुढील जप्तीकारवाईचा कटु प्रसंग टाळावा असे स्पष्ट केले होते इतर मुख्याधिकारी यांचे प्रमाणे या ही मुख्याधिकारी नोटीसा पाठवुन धमकी देण्या पलिकडे काहीही करणार नाही असे छाबडा यांनी गृहीत धरले होते त्या मुळे छाबडा यांनी सप्टेंबर महीना अखेर पयर्ंत थकबाकीची रक्कम पालिकेकडे जमा केली नाही म्हणुन शनिवारी 1 आक्टांेबर रोजी पालिकेने छाबडा हायस्कुल सील करण्याचा निणर्य घेतला त्या नुसार कर विभागाच्या प्रमुख भक्ती जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले या पथकाने मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या आदेशा नुसार छाबडा हायस्कुल इमारतीच्या मुख्या प्रवेशव्दाराला सील ठोकले आणि आपली मिळकत परत आपल्या ताब्यात घेतली.


Back to top button
Don`t copy text!