समुद्राची पातळी वाढण्याची शक्यता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य,सातारा, दि.७: येथील हवामान विभागाने सोमवार ७ ते बुधवार ९ सप्टेंबर दरम्यानच्या काळात राज्यातील समुद्र किनार्‍यावर भरतीच्या वेळी पाण्याचा जोर वाढण्याची शक्यता काल वर्तविली.

तसेच मुरगाव, पणजी, वास्कोसारख्या सखल भागात समुद्र किनार्‍यावर पाण्याची पातळी वाढण्याबरोबरच मोठ्या लाटांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात दक्षिण-पूर्व आणि पूर्ण-मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून मच्छीमारांनी केरळ कर्नाटक किनार्‍यावर येत्या ८ सप्टेंबरपर्यंत मासेमारीसाठी उतरू नये, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे. 

भरतीच्या वेळी मोठ्या लाटा उसळण्याची शक्य्ता वर्तविण्यात आली आहे. या काळात समुद्र किनार्‍याजवळ बोटी चालविणे धोक्याचे ठरू शकते. समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात बोटी एकमेकांजवळ उभ्या करून ठेवू नयेत, अशी सूचना करण्यात आली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!