आयएएसएसटीच्या वैज्ञानिकांनी जखमांसाठी वनौषधीयुक्त स्मार्ट बँडेज विकसित केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, 30 : केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या इन्स्टिटयूट ऑफ ऍडव्हान्सड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (आयएएसएसटी) या स्वायत्त संस्थेच्या वैज्ञानिकांनी जखमांसाठी पीएच-रिस्पॉन्सिव्ह स्मार्ट बँडेज विकसित केले आहे ,जे जखमेसाठी उपयुक्त असुन, या औषधाचा पीएच टिकुन राहतो. कापूस आणि ज्यूट यासारख्या स्वस्त आणि टिकाऊ वस्तूंचा वापर करून सूक्ष्म तंत्रज्ञानावर आधारित कॉटन पॅच विकसित केला आहे.

आयएएसएसटीचे सह प्राध्यापक डॉ. देवाशिष चौधरी यांनी केलेल्या संशोधनात, ज्युट कार्बन डॉट्ससह  नॅनो कॉम्पोजिट हायड्रोजेलयुक्त कॉम्पॅक्ट कॉटन पॅच  तयार केले आहे. फ्लोरोसंट कार्बन डॉट्सचे सिंथेसाइझिंग करण्यासाठी ज्यूटचा  पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे आणि ते पसरले जावे यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. कडुलिंबाच्या पानांचा  (आझादिराछताइंडिका) अर्क हे नमुना औषध अभ्यासात  उदाहरण म्हणून घेतले आहे.

एसीएस सस्टेनेबल केम या जर्नलमध्ये हा अभ्यास. प्रकाशित केला असून  नैसर्गिक उत्पादने – जूट आणि कडुनिंबाच्या पानांचा अर्क वापरुन उत्तेजक-प्रतिसाद देणारी औषध वितरण प्रणालीचे प्रात्यक्षिक यात आहे.  ज्युट कार्बन डॉट्स हायड्रोजेल मॅट्रिक्स-कॉटन  पॅचमध्ये बंदिस्त केले असून दोन वेगळ्या पीएच पातळीवर प्रभावीपणे औषध पुरवठा करू शकतात.

जखमेत  जीवाणूचा संसर्ग वाढल्यास फॅब्रिकेटेड हायब्रिड कॉटन पॅचचा उत्तेजक-प्रतिसादात्मक गुणधर्म  फायद्याचा ठरतो.  आणि यामुळे खालच्या पीएचकडे औषध जाते  जे या परिस्थितीत अनुकूल आहे. कॉटन  पॅचचे हे पीएच-प्रतिसादात्मक वर्तन कार्बन डॉट तयार करताना वेगवेगळ्या मॉलेक्युलर संबंधांमुळे सिस्टममध्ये समाविष्ट केलेल्या जूट कार्बन डॉट्सच्या विशिष्ट वर्तनानुसार आहे.

डॉ. देवाशिष चौधरी यांच्या समूहाने यापूर्वी एक कॉम्पॅक्ट कॉटन पॅच बनवला होता ज्यामध्ये जखमा बऱ्या  होण्याची उत्कृष्ट क्षमता दर्शविली  होती परंतु त्यात औषध भरल्यावर अनियंत्रित प्रवाहामुळे ते लाभदायक ठरले नाही.  सध्याच्या कामात, त्यांनी कॉटन पॅचच्या औषधाच्या प्रवाहाला नियंत्रित केले, ज्यामुळे ते जखमे साठी स्मार्ट ड्रेसिंग बनले.

कोणत्याही जखमेच्या आसपास, जीवाणूंच्या संसर्गामुळे पीएच बदलते. म्हणून त्यांनी कॉटन  पॅचसह पीएच-रिस्पॉन्सिव्ह औषध वितरण प्रणाली विकसित केली. कार्बन डॉट्स  जे शून्य-आयामी नॅनोमटेरियल्स आहेत, त्यांच्या विशिष्ट कार्बन कोअर आणि सरफेस फक्शनल गटांमुळे विविध पीएचसाठी भिन्न वर्तन प्रदर्शित करण्यासाठी डिझाइन केले जाऊ शकतात. म्हणूनच, औषध प्रवाह तपासणीसाठी हायब्रीड कॉटन पॅचेस बनवण्यासाठी नॅनो-फिलर म्हणून वेगवेगळे कार्बन डॉट्स वापरले गेले.

हायब्रीड कॉटन पॅचच्या अशा उत्तेजक-प्रतिसाद वर्तनाचा विकास  जखमेसाठी ते स्मार्ट ड्रेसिंग किंवा मलमपट्टी म्हणून वापरण्याचा मार्ग सुकर झाला. पॅच तयार करण्यासाठी कॉटन आणि ज्यूट यासारख्या स्वस्त आणि टिकाऊ साहित्याचा वापर केल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया जैव संगत, बिन विषारी, कमी खर्च आणि टिकाऊ झाली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!