दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । फलटण । भोर तालुक्यातील पाल येथील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी स्वराज्याच्या महाराणी श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब यांच्या स्मृतिस्थळाचा व शिवपट्टण राजवाडा परिसराच्या विकासासाठी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. सदरील ठिकाणी श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब यांच्या स्मृतिस्थळाचा विकास करण्यासाठी सदरील निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. महाराणी श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब यांच्या स्मृतिस्थळाचा व शिवपट्टण राजवाडा परिसराच्या वैज्ञानिक उत्खननाचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी महाराणी श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब ट्रस्टचे उपाध्यक्ष हेमंत नाईक निंबाळकर, विश्वस्त सौ. अनुराधा देशमुख, नाना धुमाळ, दामोदर मगदुम, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तुषार नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक किशेारसिंह नाईक निंबाळकर, प्रदीप मरळ, भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पुरातत्व विभाग सहाय्यक संचालक विलास वहाने, युवराज निंबाळकर, नाना भुरुक, पाल ग्रामपंचायतीचे सरपंच गोरक्ष शिर्के यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.