माण तालुक्यातील प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळास्तरिय विज्ञान प्रदर्शनाचा उत्साह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 29 डिसेंबर 2024 | दहिवडी | शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये केंद्रशाळा पिंपरी तालुका माण येथे एक अनोखा विज्ञान प्रदर्शन उपक्रम संपन्न झाला, ज्याचे कुकुडवाड बीटचे शिक्षण विस्ताराधिकरी रमेश गंबरे यांनी विशेष कौतुक केले. हा उपक्रम फलटण डाएटचे अधिव्याख्याता मा. विजयकुमार कोकरे व माण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

तालुक्यात प्रथमच असा जिल्हा परिषद प्राथमिक शाळास्तरिय विज्ञान प्रदर्शन उपक्रम आयोजित करण्यात आला, ज्याचे विशेषत्व म्हणजे विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मितीतून नवसंकल्पणांना प्रोत्साहन देणे. मुख्याध्यापक अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक शिक्षकांनी विद्यार्थ्यांकरवी वीसेक विभिन्न वैज्ञानिक उपकरणे व साहित्य तयार करवून हे प्रदर्शन अतिशय चांगल्या प्रकारे उत्साहात भरविण्यात आले होते. यामध्ये मुलामुलींचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला.

केंद्रप्रमुख सौ. शोभा पवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, मान्यवरांसमवेत परीक्षकांनी प्रदर्शनात मांडणी केलेल्या साहित्य उपकरणांची माहिती जाणून घेवून मुलांना शाब्बासकी देत कौतुक केले. परिक्षकांनी मुल्यांकण मुद्द्यांनुसार गुणांकन करून प्रथम – आदिती लक्ष्मण सुळे, द्वितीय – वेदिका सुनिल सातपुते, तृतीय – अनुष्का आनंदा शिलवंत असे क्रमांक काढले. त्यांना SMC उपाध्यक्ष मा. सौ. अफसाना हारूण मुलाणी व इतर मान्यवरांचे हस्ते स्मृतिचिन्ह ट्रॉफी व प्रमाणपत्र तर इतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

SMC अध्यक्ष आण्णासो सातपुते, उपाध्यक्ष सौ. अफसाना मुलाणी, सदस्यांसह पालक ग्रामस्थ मान्यवर अधिकारी पदाधिकाऱ्यांनी सहभागी मुलांसह शिक्षकांचे कौतुक केले. स्वागत विजयकुमार चव्हाण सर, प्रास्ताविक मुख्याध्यापक अविनाश शिंदे सर तर सूत्रसंचालन सुरजकुमार निकाळजे सरांनी केले. प्रदर्शन तयारी मांडणी कार्य सौ. कुलकर्णी मॅडम सह सौ. सुरेखा डोईफोडे मॅडम, यादव मॅडम, इतर शिक्षकांनी केले. तसेच आदिवासी पारधी समाज विकास संस्था, दहिवडी च्या संस्थापक सचिव स्मृतिशेष सौ. सरोजिनी अविनाश शिंदे यांचे स्मरणार्थ प्रथम तीन क्रमांकांना सन्मानचिन्ह ट्रॉफी व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणाऱ्या ॲड. आशुतोष सरोजिनी अविनाश शिंदे, खजिनदार – आपास विसं, दहिवडी व प्रथम तीन क्रमांकांना शैक्षणिक साहित्य देणाऱ्या विज्ञान शिक्षिका सौ. चैताली कुलकर्णी मॅडम तसेच परिक्षक म्हणून लाभलेले सौ. मनिषा घरडे मॅडम, अक्षय माने सर लोधवडे यांचे विशेष आभार पंकज कदम सरांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!