
दैनिक स्थैर्य । 9 मार्च 2025। फलटण । गुणवरे येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेजमध्ये सायन्स डे उत्साहात साजरा करण्यात आला.
सायन्स डेच्या निमित्ताने इयत्ता नर्सरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, कॉम्प्युटर, अबॅकस, आर्ट अँड क्राफ्ट अशा विविध विषयावर उत्तम सादरीकरण केेले.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक संभाजीराव गावडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी व संस्थेचे अध्यक्ष ईश्वरतात्या गावडे, सचिव सौ. साधनाताई गावडे, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थितीत होते.
कार्यक्रमाची सुरुवात संभाजी गावडे यांच्या हस्ते फित कापून झाली. सौ. साधना गावडे यांनीही विद्यार्थ्यांचे कला गुण व त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले व व राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्टुडन्ट लीड कॉन्फरन्स ला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य श्री गिरिधर गावडे म्हणाले, दरवर्षी मुलांच्या भविष्यासाठी उपयुक्त असणारे शिक्षण शाळा पुरवते. विद्यार्थ्यांच्या मध्ये नेतृत्व गुण निर्माण व्हावेत म्हणून आज विद्यार्थी नेतृत्व परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीतील विद्यार्थिंनी सई निंबाळकर हिने केले.