दैनिक स्थैर्य । दि. ०४ नोव्हेंबर २०२२ । बारामती । ‘साएटिका’ या आजारात कंबरेपासून एका बाजूचा पार्श्वभाग, मांडीचा मागचा भाग आणि पोटरीत असह्य कळा येतात. या कळांबरोबरच या भागात मुंग्या, जडपणा आणि बधीरपणाही येऊ शकतो.
आजार बळावल्यास पावलांमध्ये जडपणा आणि कमजोरी येते. साएटिका जर अगदी कमी प्रमाणात होत असेल, तर योग्य विश्रांती, योग्य शास्त्रीय उपाचारयुक्त व्यायाम उपयुक्त ठरू शकतात. ही वेदना खूपच त्रास द्यायला लागली, तर तिचं शास्त्रीय निदान करणं गरजेचं ठरतं. कंबरेचा एक्स-रे आणि एमआरआय या दोन तपासण्या योग्य निदान होण्यास अतिशय उपयुक्त ठरतात. बऱ्याच रुग्णांमध्ये पायाकडे जाणारी नस मणक्यातून बाहेर पडतानाच दबली गेलेली असते. उभं राहिल्यावर आणि चालायला लागल्यावर ती अधिकच दबली जाते आणि या कळा असह्य प्रमाणात सुरू होतात. दोन मणक्यातली चकती घसरणं, मणके एकमेकांवर घसरणं, नस बाहेर पडताना दोन मणक्यांतल्या जागेत अतिरिक्त कॅल्शियम साठल्यानं चिंचोळी होणं, अशी अनेक कारणं या आजाराला कारणीभूत ठरतात. एमआरआयच्या चाचणीत नेमक्या कारणाचं निदान होतं. साएटिकाची वेदना असह्य होऊन रुग्ण बेजार झाल्यास लहानशा शस्त्रक्रियेनं व्यक्ती वेदनामुक्त होवू शकते असा सल्ला बरेच डॉक्टर देतात पण शस्त्रक्रिया म्हणजे कायमस्वरूपी औषध नाही. तेव्हा कंबरेपासून खाली घोट्या पर्यंत स्नायू आणि मांस पेशी यांचा व्यायाम होणे महत्वाचे आहे. आम्ही डॉ. अकोलकर फिजियोथेरेपी क्लिनिक मध्ये तुम्हाला आमच्या कडील कौशल्याचा वापर करून शस्त्रक्रिया मुक्त अशी उपचार पद्धती देऊन पुढील काही काळामध्ये तुम्हाला ह्या असहाय्य वेदनान पासून मुक्त करतो. तत्पूर्वी आपण काही गोष्टी समजून घेऊयात,
साएटिका म्हणजे काय?
कंबरेच्या दोन मणक्यांमध्ये असलेली कुर्चा (डिस्क) घसरल्यामुळे कंबरेत निर्माण होणारी असह्य वेदना आपण कुणाला ना कुणाला होत असल्याचं नेहमीच पाहतो. याला स्लिप्ड डिस्क असं नाव आहे. दुर्दैवानं या आजारावरच्या उपचारांबद्दल जनमानसात असंख्य गैरसमज पसरलेले आपण पाहतो. यात पार्श्वभूमीवर या आजारावर उपलब्ध झालेल्या एका अत्याधुनिक आणि लोकोपयोगी उपचार पद्धतीची माहिती लोकांना व्हावी, म्हणून आपण त्यातल्या घटकांची सविस्तर माहिती घेऊ. कंबरेच्या मणक्यांमध्ये स्लिप्ड डिस्क (गादी, कुर्चा घसरणं) झाल्यास खालील लक्षणं दिसून येतात.
कंबरदुखी : विशेषतः बसल्यावर किंवा पुढे वाकण्याचा प्रयत्न केल्यास होणारी वेदना. ही अतिशय असह्य असू शकतो.
साएटिका : घसरलेली चकती पायाकडे जाणाऱ्या नसेत घुसल्यास पार्श्वभाग, मांडीचा मागचा भाग आणि पोटरीपर्यंत असह्य वेदना पसरू शकते. वेदनेबरोबरच मांडी आणि पायात मुंग्या येणं, जडपणा आणि बधिरता पसरू शकते.
क्लॉडिकेशन : घसरलेली चकती जर आणखी तीव्रतेनं दाब आणू लागली, तर हे लक्षण दिसतं. यात, थोडं अंतर चाललं की कंबर, मांड्या आणि पोटऱ्या भरून येतात. दुखू लागतात. मुंग्या, जडपणा आणि बधीरपणाही जाणवण्याची शक्यता असते. या लक्षणांमुळे रुग्णाला चालणं, थांबवणंच भाग पडतं.
घोटा आणि पावलातली शक्ती कमी होणं : अतिशय वाढलेल्या आजारात पायाच्या स्नायूत कमजोरी येऊन चालणं अशक्य होण्याची शक्यता असते. याला फूट ड्रॉप म्हणतात. स्लिप डिस्क या आजारात सुरुवातीला शस्त्रक्रियेशिवाय उपचार केले जातात हे खरं; पण वेदना तशाच सुरू राहिल्यास रुग्णाची अवस्था कठीण होते. रोजच वेदना सहन करत आयुष्य कंठण्याची वेळ त्याच्यावर येते. त्यातच समाजात या आजाराबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे शस्त्रक्रियेला घाबरून दुखणं सहन करण्याकडे अनेकांचा कल असतो. अनेकदा हे दुखणं मोठी शस्त्रक्रिया करण्याएवढं तीव्र नसतं. दैनंदिन जीवनात मात्र कायमचा त्रास उत्पन्न करणारं ठरतं.
ह्या वरील लक्षणांन पैकी कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित संपर्क साधा. डॉक्टरांची वैशिष्टे-
· डॉ. रोहन अकोलकर हे स्पोर्ट फिजियोथेरेपी मध्ये पीएच.डी. असणारे सर्वोत्तम डॉक्टर आहेत.
· जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या FIFA WORLD CUP 2018 रशिया मध्ये सहभाग घेणारे ते एकमेव भारतीय फिजियोथेरेपीस्ट तज्ञ डॉक्टर आहेत.
· डॉक्टरांना असणारा प्रचंड अनुभव त्याचबरोबर त्यांचे उच्च शिक्षण.
· अथर्व फिजियोथेरेपी क्लिनिक मध्ये असणाऱ्या अत्याधुनिक उपकरणे आणि शास्त्रीय व्यायामाचा वापर करून उपचार केले जातात.
· जर्मन टेक्नोलॉजीच्या मशीन्स उदा. शोकवेव थेरपी उपचार पद्धती, योग्य परिणामकारक असे उच्च प्रतीचे लेझर (Class 4 Laser), PEMF Therapy उपकरणे ह्या आणि अनेक अश्या उपकरणांचा उपयोग करून मणक्यांच्या, पाठीच्या अनेक स्नायू आणि मांसपेशी यांचे दुखणे कायमचे बरे करू शकतो.
संपर्कासाठी पत्ता-
1. डी. एस. ग्रुप., पहिला मजला, आर्यमान हॉटेल च्या पाठीमागे, लक्ष्मीनगर, फलटण.-ओपीडी वेळ दु 2:00 ते सं 6:00 पर्यंत.
2. साई बालरुग्णालय, तळ मजला, रिंग रोड (S.T. Stand च्या पाठीमागे) बारामती, ओपीडी वेळ दुपारी 1:00 ते सायंकाळी 5:00 पर्यंत.
3. तांबे कमर्शीअल कॉम्प्लेक्स, सुभद्रा मॉल जवळ भिगवण रोड, बारामती- ओपीडी वेळ सायंकाळी 6:30 ते रात्री 8:30 पर्यंत.
4. डॉ ढोले कॉम्प्लेक्स, डॉ दोशी हॉस्पिटल शेजारी,पुणे सोलापूर हायवे मदणवाडी चौफुला भिगवण ओपीडी वेळ स 9:30 ते 11:30 पर्यंत.
मोबाईल नंबर-7350069955